रंगकाम करण्यासाठी गायीच्या शेणापासून बनवलेले वेदिक रंगांचे आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

गायीचे शेण मिळण्यासाठी प्रथम गायी जिवंत रहाणे आवश्यक आहे.

धारबांदोडा, उसगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

धारबांदोडा येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अब्दुल सय्यद या धर्मांधाला पोलिसांनी १० जानेवारी या दिवशी मडगाव रेल्वेस्थानकावर अटक करून त्या मुलीची सुटका केली.

(म्हणे) ‘भारताकडून कालापानी, लिपुलेख आदी भाग परत घेणार !  

ओली यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप, वाढती बेरोजगारी आणि सरकारची अकार्यक्षमता यांवरून टीका होत असल्याने ते लपवण्यासाठी ओली भारतासमवतेच्या सीमावादाचे सूत्र उपस्थित करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

निधन वार्ता 

सनातनच्या साधिका सौ. संगिता मर्दा यांचे वडील बद्रीनारायण शंकरलाल करवा (वय ८४ वर्षे) यांचे १० जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, १ सून, २ मुली, २ जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.

उदासीनता घालवून कार्यप्रवृत्त करणारा आणि राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा स्वामी विवेकानंद यांचा आध्यात्मिक संदेश !

‘सद्यःकाळात श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सिंहगर्जनेने कथन करा ! त्याचे बासरीवादन आणि अन्य लीला सांगून राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण होत नाही.

अवैध धंद्यांशी निगडित असलेल्या उमेदवाराला मतदारांनी नाकारावे !

‘अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशांचा वापर करून निवडणुका जिंकून अवैध धंदे राजरोसपणे चालवण्याची त्यांना अनुमती मिळणार नाही’, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यायची आहे, असे ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’ने म्हटले आहे.

दिवसाला ६०० जणांचे लसीकरण करणार – पालकमंत्री

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या फेरीमध्ये जिल्ह्यातील ९ सहस्र ४३४ आधुनिक वैद्य, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.

कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १९ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात गोवा राज्यातील शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांतील १९ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर दिली.

अशांना फाशीची शिक्षा होणारा कायदा करा !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि कोलकाता उच्च न्यायालयातील अधिवक्ता कल्याण बॅनर्जी यांनी देवी सीतामाता यांच्याविषयी अनुद्गार काढल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या विरोधात भागधारक फौजदारी तक्रार करणार

म्हापसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या (म्हापसा अर्बन बँकेच्या) संचालकांच्या विरोधात फौजदारी तक्रार करण्याचा निर्णय पतसंस्थेच्या भागधारकांनी घेतला आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचेही ठरवण्यात आले.