नवी मुंबईत पंतप्रधान निवास योजनेला सर्व पक्षियांचा विरोध

सिडकोने पंतप्रधान आवास हा गृहप्रकल्प उभा करायला घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी शिवसेनेने दिली आहे.

माजी कृषीमंत्री शरद पवारांच्या मनातले मोदींनी करून दाखवले ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा कृषी कायद्याला समर्थन दिले मात्र काहींची राजकीय दुकानदारी बंद होईल म्हणून याला विरोध करण्यात आला.

३१ डिसेंबरच्या अपप्रकारांच्या विरोधात धारावी, मुंबई पोलीस ठाण्यात निवेदन

२६ डिसेंबर या दिवशी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे यांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाकाळात नागरिकांना साहाय्य करणार्‍या पोलिसांचा युवासेनेच्या वतीने सन्मान

कोरोनाकाळात नागरिकांना साहाय्य करणार्‍या  पोलिसांचा युवासेनेच्या वतीने मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शाल आणि पुस्तके देऊन सन्मान.

सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याठी मुदतवाढ ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस दिल्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत; मात्र मी शिवसेनेमध्ये आहे, शिवसेनेतच राहीन आणि शिवसेनेतच मरीन.

मराठा आणि मागासवर्गीय समाजात तेढ निर्माण करणारे भुजबळ आणि वडेट्टीवार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा !

छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यामुळे मराठा आणि इतर मागासवर्गीय या दोन समाजात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे दोन्ही नेते भडकावू वक्तव्ये करत आहेत.

काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली पोलिसांना दिसली नाही का ? – रविकिरण इंगवले, शहरप्रमुख, शिवसेना

पदवीधर निवडणुकीत झालेले मेळावे, तसेच रॅलीमध्ये ट्रॅक्टरवर दिमाखात बसलेली नेतेमंडळी पोलीस प्रशासनाला दिसली नाही. शिवाजी पेठेत फिरंगाई प्रभागात झालेला मेळावा मात्र पोलिसांना दिसला आणि त्यांनी माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला.

पोलीस प्रशासनाने कसायांचा कायमचा बंदोबस्त करून गोहत्या थांबवावी ! – मिलिंद एकबोटे, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ

कसायांकडून दिवसाढवळ्या पोलिसांसमक्ष गोरक्षकांवर आक्रमण झाले याचा अर्थ कसायांना कायद्याचा धाक आणि पोलिसांची भीती राहिलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कसायांचा कायमचा बंदोबस्त करून गोहत्या थांबवावी.  

कॉलसेंटरमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो युवकांची फसवणूक

कॉलसेंटरमध्ये नोकरी आहे, अशी जाहिरात देऊन शेकडो युवकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कैलास भारत कसबे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लातूर येथे बनला पहिला रेल्वे कोच

मराठवाड्यातील लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिला रेल्वे कोच शेल सिद्ध करण्यात आला आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर हा पहिला कोच शेल पूर्णत्वाने साकार करण्यात आला.