(म्हणे) ‘इस्टरचे जेवण मद्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही !’ – आयरिश रॉड्रीग्स

सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी इस्टरसाठी ११ एप्रिल या दिवशी लोकांना त्यांच्या आवडीचे मद्य विकत घेता यावे, यासाठी काही कालावधीसाठी मद्याची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

शासकीय रुग्णालयातील हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवाया शासनाने रोखाव्यात !

कल्याणच्या नेतीवली येथील शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना बायबलची प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात असल्याचे आढळल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हा नियम मुसलमान लोकप्रतिनिधींना लागू असेल का ?

‘वर्ष १९५१ मध्ये देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. वर्ष २०११ मध्ये ती १२१ कोटींहून अधिक झाली, तर २०२५ पर्यंत ती १५० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. देशातील जन्मदर वाढला; पण साधनांमध्ये तुलनेने काही वाढ झालेली नाही

राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना ३ मासांची मुदतवाढ

राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याच्या राज्यशासनाच्या प्रस्तावाला केंद्रशासनाने संमती दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १८१

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८१ पर्यंत पोचली आहे. मुंबईमध्ये नवीन ७ रुग्ण आढळले आहेत, तर नागपूर येथे १ नवीन रुग्ण आढळला आहे.

कोरोनारूपी असुराचा समूळ नायनाट करण्यासाठी रत्नागिरीत कालभैरवाला गार्‍हाणे

कोरोना संकटातून संपूर्ण रत्नागिरीसह तमाम जनतेला मुक्त करावे. कोरोना विषाणूची बाधा कोणालाही होऊ नये आणि रत्नागिरीतल्या नागरिकांना कायद्याच्या शिस्तीचे पालन करण्याची सबुद्धी प्राप्त होवो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कोणाची ओळख असल्याशिवाय होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

‘साधकांनो, स्वतःत अहं वाढू न देण्यासाठी देवाप्रती क्षणोक्षणी कृतज्ञ राहूया !’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

देवाने आपल्याला सुदृढ आणि सक्षम अवयव दिले आहेत. त्यासाठी आपण सतत देवाच्या चरणी कृतज्ञ राहूया.