कोटी कोटी प्रणाम !

• सनातन आश्रम, मिरज येथील ५१ वे संत पू. जयराम जोशीआजोबा यांचा आज वाढदिवस !
• सनातनच्या सिंधुदुर्ग येथील सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा आज वाढदिवस !

देहलीतील दंगल भडकावण्यामागे पाकचा हात !

भारताने संयुक्त राष्ट्र किंवा मानवाधिकार परिषद यांच्याकडे पुरावे सादर करून पाकिस्तान सुधारेल, ही अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे. अशा गोष्टींत वेळ दवडण्यापेक्षा पाकला नेस्तनाबूत केल्यास सर्वच समस्या सुटतील ! भारतद्वेषाने पछाडलेला पाक भारतात अशांतता पसरवण्यासाठी कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो, याचे हे उदाहरण आहे.

राजस्थान येथील बाबा खाटूश्याम मेळ्यामध्ये भंडारे चालवण्यासाठीच्या शुल्कात १० पटींने वाढ

भंडारे चालवणार्‍यांना द्यावे लागणार ११ ते २१ सहस्र रुपये
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदूंच्या धार्मिक यात्रांवर असा ‘जिझिया’ कर लावण्यात येत असेल, तर त्यात आश्‍चर्य ते काय ? उलट काँग्रेसने हिंदूंच्या यात्रांना अनुदान दिले, तर ते आश्‍चर्य ठरील !

(म्हणे) ‘मुसलमान असल्याने ताहिर हुसेन शिक्षा भोगत आहे !’ 

आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांची बांग ! प्रथम गुन्हे करायचे आणि नंतर कारवाई झाली की, नेहमीप्रमाणे मुसलमान असल्याचा राग आळवायचा, हे आता नित्याचेच झाले आहे ! त्यामुळे भारतीय जनता अशा मुसलमानांचे डावपेच आता समजू लागली आहे; मात्र ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी त्यांचीच ‘री’ ओढणार यातही शंका नाही !

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाकडून ‘सीएए’विषयी चुकीच्या माहितीचा प्रसार !

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचे खरे स्वरूप ! याविषयी आयोग आणि अमेरिका काही बोलतील कि पुन्हा थयथयाट करतील ? यातून आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचा भारतद्वेषासह अल्पसंख्यांक धार्जिणेपणाच दिसून येतो. असा आयोग जगभरात धार्मिक सलोखा राखेल का ? भारताने याला तात्काळ प्रत्युत्तर द्यायला हवे !

मदरसे आणि गुरुकूल येथे धाड टाकल्यास गुरुकुलांमध्ये काहीच सापडणार नाही ! – योगऋषी रामदेवबाबा

गुरुकुलांना ‘हिंदु मदरसा’ म्हणणार्‍यांना योगऋषी रामदेवबाबा यांचे आव्हान ! पतंजलि योगपिठाच्या ‘आचार्यकुलम्’ या गुरुकुलाला ‘हिंदु मदरसा’ म्हणतात. जर असे आहे, तर देशातील सर्व मदरसे आणि गुरुकूल यांच्यावर एकाच वेळी धाडी टाकाव्यात. मी निश्‍चितपणे सांगतो की, गुरुकुलांमध्ये एकही शस्त्र सापडणार नाही.

ज्योतिषशास्त्र विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून संशोधन ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देहली येथील ज्योतिष परिषदेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग : भावी पिढीला ज्योतिषशास्त्र विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून अविरतपणे संशोधन चालू आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले.

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानात सहभागी व्हा ! – हिंदु जनजागृती समितीचे नागरिकांना आवाहन

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंग खेळून जलाशयात उतरणे हे धर्मशास्त्र विसंगत आहे. हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र ठाऊक व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आली आहे.