कोरोनाचा धोका असतांनाही चर्चमध्ये लोक जमत असल्याची न्यायालयात तक्रार

कोरोनाचा जगभरात धोका निर्माण झाला असतांना, कोरोनाग्रस्त ख्रिस्ती राष्ट्रांमध्ये चर्च बंद ठेवण्यात आली असतांनाही भारतात त्यासाठी अशी याचिकाही प्रविष्ट करावी लागते, याला काय म्हणायचे ? हिंदूंनी त्यांची सर्व लहान-मोठी मंदिरे, तसेच तीर्थक्षेत्रे बंद केली आहेत. असे असतांना अन्य धर्मियांकडून . . . असा निष्काळजीपणा कसा केला जातो ?

२२ मार्च या दिवशी ‘जनता कर्फ्यू’ पाळा ! – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

देशावर कोरोनाचे संकट ! आपण या जागतिक साथीच्या विरोधात लढणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात २२ मार्च या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही नागरिकांनी स्वतःहून बाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ (स्वयंघोषित संचारबंदी) लागू करून घ्यावी. – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

देशात १६ राज्यांत कोरोनाचे १७२ रुग्ण

देशभरातील १६ राज्यांमध्ये कोरोनाची लागण झाली असून रुग्णांची संख्या १७२ पर्यंत पोचली आहे. यांमध्ये २५ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. पंजाब येथे जर्मनी आणि इटली येथून परतलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरील निर्बंध हटवले

बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे आणि कर्ज वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने ५ मार्चला येस बँकेवर आर्थिक निर्बंध घातले होते.

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

‘ऑपइंडिया हिंदी’ वृत्तसंकेतस्थळाच्या ट्विटर खात्यावर १२ घंट्यांसाठी बंदी

देहली दंगलीतील धर्मांधांची बाजू घेणार्‍या प्रसारमाध्यमांना उघडे पाडण्याचा प्रयत्न केल्याचा परिणाम ! गूगल, फेसबूक, ट्विटर आदी विदेशी आस्थापने असणारी सामाजिक माध्यमे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा द्वेष करून धर्मांधांना सातत्याने पाठीशी घालत असतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे. अशांवर कधी अशी बंदी घातली गेली आहे का ?

देहलीतील दंगलीच्या काळात धर्मांधांना पाकमधील २०० हून अधिक ट्विटर खात्यांवरून भडकावण्याचा प्रयत्न !

इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना आता या दंगलीसाठी पाकला जाब विचारणार आहेत का ? देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलणार आहेत का ?

कोेरोनामुळे अमेरिकेत २२ लाख आणि ब्रिटनमध्ये ५ लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता ! – संशोधन

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न न केल्यास ब्रिटनमध्ये ५ लाख आणि अमेरिकेत २२ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. कोरोनामुळे आरोग्यसेवेवर मोठा भार पडणार आहे, असा निष्कर्ष येथील प्राध्यापक नील फर्ग्युसन यांनी केलेल्या संशोधनात मांडण्यात आला आहे.