महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १८१

मुंबई – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८१ पर्यंत पोचली आहे. मुंबईमध्ये नवीन ७ रुग्ण आढळले आहेत, तर नागपूर येथे १ नवीन रुग्ण आढळला आहे. मुंबईतील रुग्णांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. २७ मार्च या दिवशी राज्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले होते. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.