काही जण मरणारच आहे ! – ब्राझीलचे राष्ट्रपती

‘मला क्षमा करा. काही जण मरणारच आहेत. वाहतुकीमुळे एखाद्याचा मृत्यू होतो; म्हणून तुम्ही एका चारचाकी वाहनाचा कारखाना बंद करू शकत नाही’, असे विधान ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयी त्यांच्या घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले.

‘कॉग्निझंट’ आस्थापन कर्मचार्‍यांना अतिरिक्त वेतन देणार

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे आस्थापन असलेल्या ‘कॉग्निझंट’ने कर्मचार्‍यांसाठी सध्याच्या दळणवळण बंदीच्या काळात अतिरिक्त वेतन देण्याची घोषणा केली आहे.

‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे २७ मार्च या दिवशी दुपारी २ वाजता माउंट अबू येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या १०४ वर्षांच्या होत्या.

इटलीमध्ये ५ सहस्रहून अधिक वैद्यकीय कर्मचारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’

इटलीमध्ये आतापर्यंत ५ सहस्रहून अधिक डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, रुग्णवाहिका कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ घंट्यांत इटलीमध्ये ९१५ जणांचा मृत्यू

जगभरात १९५ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण आणि व मृत यांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५ लाख ९७ सहस्र २६७ झाली असून २७ सहस्र ३६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

‘घराबाहेर पडू नको’ असे सांगूनही न ऐकल्याने भावाची हत्या

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘दळणवळण बंदी’चे प्रकरण
आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल !

शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार १ मासाचे मानधन मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देणार ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक मासाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.

सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जाऊन आलेले नागरिक कोरोनाबाधित

ईश्‍वरपूर येथील सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जाऊन आलेल्या ५ नागरिकांना ही लागण झाल्याचे चार दिवसांपूर्वी स्पष्ट झाले आहे. त्यातील कोरोनाची लक्षणे दिसणार्‍यांचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यामुळे आता ईश्‍वरपूर ‘हाय अलर्ट’वर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण विभागात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात आली आहे. या ‘वॉर रूम’साठी १८००२ ६७८४६६ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.

अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलावर बलात्कार करून त्याची हत्या करणार्‍यास अटक

एका अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. अशा वासनांधांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !