विवाहसोहळा नव्‍हे, श्री गुरूंनी अनुभवण्‍यास दिलेला भावसोहळाच !

एरव्‍ही विवाह म्‍हणजे पूर्वसिद्धतेसाठी पुष्‍कळ कालावधी द्यावा लागतो; पण आमच्‍या विवाहाच्‍या वेळी केवळ एका आठवड्यात विधींसाठीची पूर्वसिद्धता, वर आणि वधू यांची वैयक्‍तिक पूर्वसिद्धता, छायाचित्रीकरण अशी सर्व गोष्‍टींची पूर्वसिद्धता सर्वकाही अल्‍प वेळेत आणि वेळेवर झाली.

‘आध्‍यात्मिक आई’ होऊन साधकांची काळजी घेणार्‍या आणि गुरुसेवेचा अखंड ध्‍यास असलेल्‍या मथुरा सेवाकेंद्रातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कु. मनीषा माहुर (वय ३० वर्षे) !

‘एकदा झुंझुनू, राजस्‍थान येथील हितचिंतक वैद्य श्री. ओमदत्त, त्‍यांची पत्नी आणि नातेवाईक यांच्‍यासह मथुरा येथील सेवाकेंद्रात आले होते. त्‍या वेळी मनीषा माहुर हिने पुष्‍कळ प्रेमाने त्‍यांची चौकशी केली. मनीषाताईमधील ‘शालीनता, सहजता आणि प्रेमभाव’ या गुणांचे कौतुक करून श्री. ओमदत्तजी म्‍हणाले, ‘‘आम्‍ही तुम्‍हाला कोटीशः नमन करतो.’’

देवाची आवड असलेली ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची आणि उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली वरळी, मुंबई येथील कु. अभिज्ञा अभिषेक मुरुकटे (वय ९ वर्षे) !

आम्‍ही गावी गेल्‍यावर अभिज्ञा न चुकता गावातील दत्तमंदिरात आरतीसाठी जाते. तेव्‍हा ती तिच्‍या मैत्रिणींना समवेत घेऊन जाते. ती मंदिरातून परत आल्‍यावर सगळ्‍यांना प्रसाद देते आणि नंतर स्‍वतः प्रसाद ग्रहण करते.

सेवेची तळमळ असणारी आणि साधकांना सेवेत साहाय्‍य करणारी फोंडा (गोवा) येथील कु. वैदेही राजेंद्र शिंदे (वय ३१ वर्षे) !

मी कु. वैदेहीसमवेत भौतिकोपचारांशी (फिजिओथेरपीशी) संबंधित सेवा करत होते. मला या सेवेचा प्रत्‍यक्ष अनुभव नव्‍हता. वैदेहीने मला सेवा करतांना पुष्‍कळ साहाय्‍य केले. त्‍यामुळे मला सेवा करण्‍यास प्रोत्‍साहन मिळाले आणि माझा आत्‍मविश्‍वास वाढला.

महाराष्‍ट्रात २८८ पैकी केवळ ६ मतदारसंघांत ८० टक्‍क्‍यांहून अधिक मतदान !

महाराष्‍ट्र विधानसभेसाठी मतदान झालेल्‍या २८८ पैकी केवळ ६ मतदारसंघांमध्‍ये ८० टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. यामध्‍ये करवीर (कोल्‍हापूर) – ८४.९६, कागल (कोल्‍हापूर) – ८२.११, सिल्लोड (नाशिक) – ८०.०८, चिमूर (चंद्रपूर) – ८१.९५, ब्रह्मापुरी (चंद्रपूर) – ८०.५४ आणि नवापूर (नंदुरबार) येथे ८१.१५ टक्‍के मतदान झाले.

महाराष्‍ट्रात ६ कोटी ४० लाख ८८ सहस्र जणांनी केले मतदान !

निवडणूक आयोगाने महाराष्‍ट्र विधानसभेचे एकूण मतदान ६५.११ टक्‍के झाल्‍याचे यापूर्वी घोषित केले होते; मात्र तपशीलवार मोजणी केल्‍यानंतर मतदानाची एकूण टक्‍केवारी ६६.०५ असल्‍याचे निवडणूक आयोगाकडून घोषित करण्‍यात आले आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ ने लगेच वस्तुस्थिती समाज समोर आणली ! – रावसाहेब देसाई, राष्ट्राध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या संदर्भात सरोज पाटील यांनी जे चुकीचे वक्‍तव्‍य केले आहे त्‍या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’ने याची लगेच नोंद घेऊन अग्रलेख लिहून पू. गुरुजींचे कार्य आणि वस्‍तूस्‍थिती समाजासमोर आणली.

मक्केत मक्केश्‍वर महादेव आहे ! – शंकराचार्य जगद्गरु स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

मक्केत मक्केश्‍वर महादेव आहे. ‘गीता प्रेस’च्या शिवपुराण अंकात याविषयी तपशीलवार लिहिले आहे; परंतु मक्का आणि मदिना ही मुसलमानांची तीर्थक्षेत्र झाली आहेत. येथे हिंदूंना जाण्यास बंदी घातली आहे. त्यावरूनच आता मुसलमानांना महाकुंभाच्या ठिकाणी प्रवेश करण्यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

रशियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र आक्रमणानंतर युक्रेनची संसद बंद

रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागल्यानंतर युक्रेनची संसद बंद करण्यात आली आहे. खासदारांना त्यांच्या कुटुंबियांना कीव शहरापासून दूर ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.