नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

नरेंद्र मोदी

सांगली – ‘देशातील २५ कोटी गरिबांची गरिबी दूर करणार्‍या नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळामध्ये ‘गरिबी हटाव, गरिबी हटाव’चे नारे दिले; पण गरिबांसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. नरेंद्र मोदी सरकारने गरिबांची गरिबी हटवण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून गरिबांची गरिबी हटवण्याचे काम केले आहे’, असे प्रतिपादन भाजपचे नेते आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी येथे केले. सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ २४ एप्रिल या दिवशी गणपति मंदिराजवळ आयोजित केलेल्या ‘नमो संवाद’ कोपरा सभेत ते बोलत होते.

या वेळी भाजपचे अभिजीत मिराजदार, अविनाश मोहिते, भारती दिगडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक भाजपच्या नेत्या भारतीताई दिगडे यांनी केले. या वेळी श्रीकांत शिंदे, अविनाश मोहिते, सुबराव मद्रासी, स्मिता पवार, उदय बेलवलकर, विशाल पवार, सुजित काटे, ओमकार पवार, रेखा पाटील, मोहन मुळे, अनिकेत खिलारे, दीपक कर्वे यांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.