जे.एन्.यु. विद्यापिठाच्या भिंतींवर लिहिलेल्या जातीद्वेषवाचक धमक्यांच्या विरोधात कारवाई करा !

विद्यापिठात शिकणार्‍या आणि हिंदु समाजाचा घटक असणार्‍या ब्राह्मण, तसेच वैश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाऊ नये, याची दक्षता विद्यापिठाकडून घेण्यात यावी.

डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारला भारताने प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, लेखक आणि इतिहास अन् संस्कृती अभ्यासक

‘फिफा फुटबॉल विश्वचषका’चे आयोजन करणार्‍या कतार देशामध्ये सर्व इस्लामी परंपरा पाळल्या जातात. कतारने यंदाच्या विश्वचषकाला धार्मिक रंग दिला आहे. विश्वचषक चालू होण्यापूर्वी कतारमध्ये ५०० हून अधिक नागरिकांचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याच्या बातम्या समोर आल्या.

पाटण (जिल्हा सातारा) येथे ५ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा हिंदु जनआक्रोश मोर्चा !

लव्ह जिहाद, धर्मांतर यांविरोधी कायद्याची मागणी !

 ‘फाडू : अ लव स्टोरी’ या वेब सिरीजमधून श्री गणेशाचा अवमान !

वेब सिरीज किंवा अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये एखादे चर्च किंवा मशीद येथे हिंदूंच्या धार्मिक मंत्राचा उल्लेख करण्याचे धाडस कुणी करू शकेल का ?

समाजात ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणे आवश्यक ! – भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे

शिवप्रतापगड उत्सव समितीच्या वतीने भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांना पुणे येथे ‘वीर जीवा महाले’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जमशेदपूर (झारखंड) येथील गुरुद्वारामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरवणारे भित्तीपत्रक प्रसारित

पंजाबमधील खलिस्तानी आतंकवाद्यांची कीड आता अन्य राज्यांतही पसरू लागली आहे. याचा मोठा परिणाम भोगायला लागण्यापूर्वीच अशा प्रवृत्तीला ठेचायला हवे !

नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे विधान करणारे काँग्रेसचे नेते राजा पटेरिया यांंना अटक

पटेरिया यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होताच त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले होते की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला.

इस्लामी देशांच्या संघटनेचे महासचिव पाकव्याप्त काश्मीरच्या दौर्‍यावर !

इस्लामी देशांना सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या सोडवण्याऐवजी काश्मीर समस्येत नाक खुपसणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेला समजेल, अशा भाषेत भारताने उत्तर देणे आवश्यक !

शबरीमला मंदिराच्या ‘सूरसम्हारा उत्सवा’साठी येणार्‍या भाविकाची सुरक्षा निश्‍चित करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !

भगवान मुरुगन् यांनी ६ दिवस युद्ध करून दानव सोरापथमन् याला पराजित केले होते. त्यानिमित्त हा उत्सव साजरा करण्यात येतो.

सीबीआयद्वारे हिंदु नेत्याच्या हत्येचे अन्वेषण करण्याची मागणी पूर्ण न झाल्याने कुटुंबियांचे उपोषण

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या हिंदुद्रोही पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता अल्पच आहे !