समाजात ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणे आवश्यक ! – भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे

डॉ. अनिल बोंडे यांना ‘वीर जीवा महाले’ पुरस्कार मिळाल्याने सनातन संस्थेकडून त्यांची भेट घेऊन अभिनंदन !

खासदार डॉ. अनिल बोंडे (सर्वांत उजवीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना डॉ. रमेश वरूडकर आणि डॉ.(सौ.) समिधा वरूडकर

अमरावती, १३ डिसेंबर (वार्ता.) – शिवप्रतापगड उत्सव समितीच्या वतीने भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांना पुणे येथे ‘वीर जीवा महाले’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने अमरावती येथे सनातन संस्थेच्या वतीने डॉ. रमेश वरूडकर आणि डॉ.(सौ.) समिधा वरूडकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या वेळी त्यांनी समाजात ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले, तसेच सनातन संस्थेच्या कार्याचेही कौतुक केले. या वेळी खासदार डॉ. अनिल बोंडे यांना हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेले ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल जिहाद ?’ हे ग्रंथ भेट देण्यात आले.