‘फाडू : अ लव स्टोरी’ या वेब सिरीजमधून श्री गणेशाचा अवमान !

श्री गणेशला प्रार्थना करतांना काबा आणि चर्च यांचा उल्लेख असणारा मिर्झा गालिब यांचे शेर ऐकवण्याचा हीन प्रकार !

मुंबई – ‘सोनी लिव्ह’ या ‘ओटीटी’ मंचावरील (‘ओव्हर द टॉप.’ याद्वारे दर्शक मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहू शकतात.) ‘फाडू : अ लव स्टोरी’ या वेब सिरीजमध्ये श्री गणेशाच्या पूजेचा अवमान करण्यात आला आहे. यात श्री गणेशाला प्रार्थना करतांना मिर्झा गालिब यांचा शेर (लहान कविता) ऐकवण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या मालिकेतील मूळ आशयाशी या दृश्याचा काहीही संबंध नाही. हा प्रसंग विनोद निर्मितीसाठी अंतर्भूत करण्यात आला आहे. अश्‍विनी अय्यर तिवारी या वेब सिरीजच्या दिग्दर्शिका, तर सौम्य जोशी हे लेखक आहेत.

या दृश्यामध्ये नायिकेचे वडील तिच्या परीक्षेच्या निकालाची वाट पहात श्री गणेशाला प्रार्थना करतांना गालिबचा शेर ऐकवत आहेत. यात ‘काबा’ (मक्का येथील मुसलमानांची पवित्र मशीद. येथे मुसलमान हजयात्रेसाठी जातात.) आणि ‘कलीस’ (चर्च) या शब्दांचा उल्लेख आहे. या वेळी एक व्यक्ती त्यांना थांबवते. त्यावर वडील म्हणतात की, मी बाप्पाला गालिबचा शेर ऐकवत आहे. हीसुद्धा एक प्रकारची पूजा आहे ना ?

संपादकीय भूमिका

वेब सिरीज किंवा अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये एखादे चर्च किंवा मशीद येथे हिंदूंच्या धार्मिक मंत्राचा उल्लेख करण्याचे धाडस कुणी करू शकेल का ?