हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये जिहादी डॉ. झाकीर नाईक का आमंत्रित ?’ या विषयावर ‘ऑनलाईन विशेष संवाद’ !
मुंबई – ‘फिफा फुटबॉल विश्वचषका’चे आयोजन करणार्या कतार देशामध्ये सर्व इस्लामी परंपरा पाळल्या जातात. कतारने यंदाच्या विश्वचषकाला धार्मिक रंग दिला आहे. विश्वचषक चालू होण्यापूर्वी कतारमध्ये ५०० हून अधिक नागरिकांचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याच्या बातम्या समोर आल्या. भारताने ‘आतंकवादी’ म्हणून घोषित केलेला डॉ. झाकीर नाईक याला सध्या कोणताही देश आश्रय देत नसतांना कतारने त्याला आश्रय दिला आहे. याच कतारने हिंदु देवीदेवतांचे विडंबन करणारा वादग्रस्त चित्रकार मकबूल फिदा हुसेन यालाही आश्रय दिला होता. तसेच कतारने नूपुर शर्मा प्रकरणात भारताला खडसावले होते. भारताने उपस्थित केलेल्या प्रश्नावर कतारने ‘डॉ. झाकीर नाईकला आम्ही बोलावले नाही’, असे ‘राजकीय उत्तर’ दिले आहे. डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्या कतारचा भारतविरोधी इतिहास पहाता त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे, हे भारताने ठरवण्याची वेळ आता आली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन इतिहास अन् संस्कृती अभ्यासक आणि लेखक अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये जिहादी डॉ. झाकीर नाईक का आमंत्रित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.
डॉ. झाकीर नाईक अटकेपासून फार काळ वाचू शकणार नाही ! – मुकेश कुमार, ‘चॅनेल हेड’, सुदर्शन न्यूज
डॉ. झाकीर नाईकला कट्टर इस्लामी देश कतारने फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजन कार्यक्रमात बोलावले. ‘फुटबॉल हा खेळ इस्लामनुसार ‘हराम’ आहे !’, हे ४ वर्षांपूर्वी डॉ. झाकीर नाईक याने म्हटले होते, तसेच त्याने त्या वेळी फुटबॉल खेळणे, पहाणे यालाही मनाई केली होती. झाकीर नाईकने त्या वेळी मलेशियात आसरा घेतला असल्याने वर्ष २०१७ पासून भारत सरकार त्याला स्वतःच्या कह्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. झाकीर नाईकच्या विरोधात वर्ष २०१९ ला दोषारोपपत्र प्रविष्ट झाले असून त्याच्या विरोधात ‘रेड कॉर्नर नोटीस’ काढण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. आता झाकीर नाईकने मलेशियातून कतार येथे स्थानांतर केल्यावर कतारने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी तो अटकेपासून फार काळ वाचवू शकणार नाही.
आंतरराष्ट्रीय आतंकवाद्याला ‘फिफा’ फुटबॉल विश्वचषकात बोलावणार्या कतारचा धिक्कार ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
झाकीर नाईकने अत्यंत हीन स्तरावर हिंदु देवीदेवतांवर टीका करत अवमान केला आहे. हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदु संघटनांच्या विरोधामुळे झाकीर नाईकला भारताबाहेर पलायन करावे लागले. ‘इसिस’सारख्या आतंकवादी संघटनांतील अनेक आतंकवाद्यांनी ‘झाकीरच्या भाषणांमुळे प्रेरणा मिळाली’, हे उघडपणे मान्य केले आहे. या आंतरराष्ट्रीय आतंकवाद्याला ‘फिफा’ फुटबॉल विश्वचषकात बोलावणार्या कतारचा आम्ही भारतीय नागरिकांच्या वतीने धिक्कार करतो.