समान नागरी कायद्याचा पुनरुच्चार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत १४ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठीचे घोषणापत्र प्रकाशित केले आहे. या घोषणापत्रामध्ये समान नागरी कायदा करण्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘आध्यात्मिक पर्यटना’च्या दृष्टीने जागतिक पर्यटन संस्थांशी साधला संवाद !

गोवा पर्यटन खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’ या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले. हा कार्यक्रम ताळगाव येथील ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम’मध्ये आयोजित करण्यात आला होता.

३ आठवड्यांनंतर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट होत आहे ‘स्लीपर हिट’ !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता ३ आठवडे झाले आहेत. चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून त्याचे ‘स्लीपर हिट’च्या दिशेने मार्गक्रमण चालू झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून ‘सनातन प्रभात’ला मिळाली आहे.

सौदी अरेबियात रहीमची मृत्यूदंडाची शिक्षा रहित होण्यासाठी केरळच्या जनतेने एकत्र केले ३४ कोटी रुपये !

रहीमऐवजी एखाद्या हिंदूच्या संदर्भात असे घडले असते, तर असा बंधूभाव दाखवण्यात आला असता का, हा पहिला प्रश्‍न ! ‘हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम’, अशी भारतीय साम्यवादाची व्याख्या असल्याने विजयन् यांनी पीडित हिंदूच्या रक्षणार्थ मुसलमानांना आवाहन केले असते का, हा दुसरा प्रश्‍न !

Patanjali Case : पतंजलि प्रकरणात ‘तुम्हाला फाडून टाकू’ म्हणणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर काही माजी न्यायमूर्तींकडून टीका !

माजी न्यायामूर्तींनी म्हटले आहे की, ‘आम्ही तुम्हाला फाडून टाकू’ असे म्हणणे ही रस्त्यावर ऐकायला येणार्‍या भाषेसारखी असून हे धोक्याचे आहे.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्‍चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

आता जे संवर्धन होणार आहे, त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्‍चित करणे आवश्यक आहे. हे दायित्व निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी – महाराष्ट्र मंदिर महासंघ

CPI(M) MANIFESTO : माकपच्या घोषणापत्रात भारताने अण्वस्त्रे नष्ट करून देशाला शक्तीहीन करण्याचे घातक आश्‍वासन !

अशा प्रकारचे राष्ट्राघातकी आश्‍वासन देऊन जनतेकडून मते मागणार्‍या पक्षावर बंदी घालून त्याच्या नेत्यांना कारागृहात डांबवण्याची मागणी जनतेने आतापर्यंत करणे आवश्यक होते. अशी मागणी न होणे हे भारतियांना लज्जास्पदच म्हणावे लागेल !

CRPF Fake Track Suit : बनावट ट्रॅक सूट विकल्याच्या प्रकरणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकार्‍याला पदावरून हटवले !

केवळ पदावरून हटवून काय उपयोग ? अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

शिरपूर (जिल्हा जळगाव) येथे मुसलमान तरुणीकडून ३ हिंदु तरुणींचे वशीकरण करण्याचा प्रयत्न फसला !

हिंदूंवर आघात करण्यात आता धर्मांध मुसलमान मुलीही सरसावल्या आहेत ! अशांवर आता अंधश्रद्धानिर्मूलन कायद्यांर्तगत कारवाई करण्याची धमक पोलीस दाखवतील का ? हिंदु तरुणींच्या मागे ठामपणे उभे रहाणार्‍या सर्व हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !

पुणे येथे मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘नोटा’ असे लिहले !

भारतात राबवण्यात येणारी लोकशाही प्रणाली साम्यवाद्यांना मान्य नाही. ज्या प्रमाणे जे.एन्.यू. आणि अन्य शैक्षणिक संस्था यांमध्ये साम्यवाद्यांचा शिरकाव झाला आहे, तसा तो ‘गोखले संस्थे’तही झाला नाही ना, याचा शोध घेणे आवश्यक !