कॅलिफोर्निया (अमेरिका) राज्याने संमत केलेल्या जातीभेदविरोधी विधेयकाला हिंदूंचा विरोध !

या विधेयकानुसार राज्यातील समान नागरी हक्क कायदा, शिक्षण आणि गृहनिर्माण संहिता यांच्यात सुधारणा करून वंशावळी अंतर्गत जातीचा समावेश संरक्षित श्रेणी म्हणून करण्यात आला आहे.

कराची (पाकिस्तान) येथे आंदोलन करणार्‍या बलुच कार्यकर्त्यांना अटक

पाकिस्तानातील कराचीमध्ये गेल्या ४ दिवसांपासून बलुच कार्यकर्त्यांचे आंदोलन चालू आहे. सिंध पोलिसांनी महिलांसह अनेक बलुच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अपहरण करण्यात आलेले दाद शाह बलोच यांची सुटका करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ! – शिकागो विश्‍वविद्यालयाचा अहवाल

प्रदूषणामुळे देहलीतील नागरिकांच्या आयुर्मानात होत आहे ११ वर्षे ९ मास इतकी घट !

श्री महाकालीमातेला फाशी देण्यात येत असलेले मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाची ‘अ‍ॅमेझॉन’कडून विक्री !

अ‍ॅमेझॉनकडून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे साहित्य विक्री केले जात असल्याने आता भारत सरकारने या आस्थापनावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये मुसलमानेतरांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करण्यास बंदी !

इस्लामी देशांत मुसलमानेतरांवर अत्याचार केले जातात, त्यांना इस्लामी पद्धतीनुसार वागण्यास बाध्य केले जाते; मात्र हेच इस्लामी देश भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात मुसलमानांच्या अधिकारांवरून भारतावर टीका करतात, हे लक्षात घ्या !

जगभरातील मुसलमानांकडून ‘हलाल हॉलिडेज’ची वाढती मागणी !

जीवनातील कुठल्याही क्षणी मुसलमानांसाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यावरून लक्षात येते !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जामीन संमत !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ते शिक्षा भोगत होते.

ब्रिटनमध्ये संशोधनाच्या नावाखाली भारतीय वंशाच्या महिलांना खाऊ घातल्या होत्या किरणोत्सर्गबाधित चपात्या !

इंग्रज भारतातून गेले; मात्र त्यानंतरही त्यांची भारत आणि भारतीय यांच्याकडे पहाण्याची वसाहतवादी मानसिकता पालटली नाही, हेच यातून दिसून येते !

चीनची हेरगिरी करणारी दुसरी नौका श्रीलंकेत येणार !

श्रीलंकेला दिवाळखोरीत सर्व प्रकारचे साहाय्य करणार्‍या भारताचा विरोध डावलून श्रीलंका चीनला अशा प्रकारे साहाय्य करतच रहाणार असेल, तर भारताने त्याला साहाय्य करण्याविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे !

भालाफेकीत नीरज चोप्रा याला मिळाले सुवर्णपदक !

बुडापेस्ट येथे चालू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानच्या खेळाडूला मागे टाकत नीरज याने हा विजय संपादन केला.