तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये मुसलमानेतरांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करण्यास बंदी !

मुसलमानेतर महिलांनाही बुरखा घालण्याची सक्ती !

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबाची राजवट येण्यापूर्वीच हिंदु औषधालाही शेष राहिले नव्हते, तर शीख काही प्रमाणात होते; मात्र आता तेही अत्यंत नगण्य आहेत. तालिबानने आता मुसलमानेतर महिलांना बुरखा घालण्याची सक्ती केली आहे, तसेच सार्वजनिक स्तरावर सण साजरे करण्यास बंदी घातली आहे.

संपादकीय भूमिका

इस्लामी देशांत मुसलमानेतरांवर अत्याचार केले जातात, त्यांना इस्लामी पद्धतीनुसार वागण्यास बाध्य केले जाते; मात्र हेच इस्लामी देश भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात मुसलमानांच्या अधिकारांवरून भारतावर टीका करतात, हे लक्षात घ्या !