राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील नियमावलीत ३१ जानेवारीपर्यंत वाढ
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेली नियमावली ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयीचा शासन निर्णय घोषित करण्यात आला केला आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेली नियमावली ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयीचा शासन निर्णय घोषित करण्यात आला केला आहे.
देशात चालू असलेल्या सामूहिक धर्मांतराच्या घटना थांबायला हव्यात. विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे मान्य करता येणार नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश सरकारांनी केलेल्या लव्ह जिहादविरोधी कायद्याचे समर्थन केले.
दरोडा घातल्याप्रकरणी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयातून त्याच्या २ साथीदारांनी पळवून नेण्याची घटना ३० डिसेंबरला घडली.
यांत्रिक पद्धतीने मासेमारी करतांना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकरी आंदोलनावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना फटकारले !
भारतातील हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे आणि धर्मनिरपेक्षेतेचे डोस पाजण्यात आल्याचे हिंदूंना सर्व धर्म सारखेच वाटतात; मात्र जगातील धर्मांधांना असे वाटत नाही, याचे हे आणखी एक उदाहरण !
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती.
गांजा लागवडीच्या प्रस्तावावर तूर्तास कोणताही विचार नाही. लागवड जरी केली, तरी ती केवळ औषधापुरतीच असेल. गांजावरून चालू असलेल्या चर्चा चुकीच्या असून गांजा लागवडीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील समुद्रात बुडणारा देहली येथील पर्यटक परवेझ खान याला येथील ‘जीवरक्षक’ संजय गोसावी यांनी सुखरूप पाण्याबाहेर काढले.