अमली पदार्थविरोधी पथकाने कह्यात घेतलेला अभिनेता एजाज खान कोरोना पॉझिटिव्ह

अमली पदार्थविरोधी पथकाच्या सर्व अधिकार्‍यांची कोरोनाची चाचणी होणार

पोलिसांच्या स्थानांतरासाठी किती पैसे घेतले हे बाहेर पडेल ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

पोलिसांच्या स्थानांतरामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण झाल्यास यामध्ये किती पैसे घेतले गेले, हे बाहेर पडेल, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४१ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४१ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ३ एप्रिल या दिवशी सकाळी ७.३० वाजता शिवशक्ती प्रतिष्ठान, कोल्हापूर परिवाराच्या वतीने टाऊन हॉल बाग परिसर येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरामध्ये स्वच्छता करून फुलांची सजावट करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेला गर्दी केल्याप्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंद !

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेला (रांझणी, तालुका पंढरपूर) येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या प्रकरणी या सभेसाठी अनुमती घेणारे विजयसिंह देशमुख यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बांगलादेशात जिहादी संघटनेच्या पदाधिकार्‍याला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्‍यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.

पुणे महानगर परिवहन (पी.एम्.पी.) सेवा बंद केल्याने प्रवासी संघटनांनी केला निषेध !

३ एप्रिलपासून पुढील ७ दिवसांसाठी सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून यामध्ये पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक करणारी पुणे महानगर परिवहन मंडळाची (पी.एम्.पी.एल्.) सेवा बंद करण्यात आली आहे.

लातूर येथे ऑक्सिजन सिलेंडरच्या मागणीत वाढ !

जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची मागणी वाढत आहे; मात्र १ सहस्र सिलेंडरची मागणी असतांना ७०० सिलेंडरचा पुरवठा होत आहे.

सोलापूर गारमेंट उद्योगाला कोरोना संसर्गामुळे मोठा फटका !

चालू वर्षातही शाळा चालू होण्याची चिन्हे नसल्याने देशभरातून गणवेशाची येणारी मागणी बंद झाली आहे. त्यामुळे गारमेंट उद्योगातील २० सहस्र कामगारांवर बेकारीची वेळ येईल, अशी माहिती सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सहसचिव प्रकाश पवार यांनी एका वृत्तपत्राला दिली.

गृहमंत्री खंडणी गोळा करत असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की ! – सुधीर मुनगंटीवार, भाजप

गृहमंत्री खोटे असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की आहे.

नैतिक दायित्व स्वीकारून मुख्यमंत्री त्यागपत्र का देत नाहीत ? – खासदार नारायण राणे, भाजप

मुख्यमंत्री नैतिक दायित्व स्वीकारून त्यागपत्र का देत नाहीत ?