छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४१ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन !

छत्रपती शिवरायांच्या ३४१ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने अभिवादन करतांना शिवशक्ती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते

कोल्हापूर, ५ एप्रिल – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४१ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ३ एप्रिल या दिवशी सकाळी ७.३० वाजता शिवशक्ती प्रतिष्ठान, कोल्हापूर परिवाराच्या वतीने टाऊन हॉल बाग परिसर येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरामध्ये स्वच्छता करून फुलांची सजावट करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी सर्वांनी ५ मिनिटे शांतता पाळून छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहिली.

या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. साताप्पा कडव, उपाध्यक्ष श्री. योगेश रोकडे, मेघाताई कुलकर्णी, सर्वश्री संदीप पाडळकर, हर्षद वाकसे, सुशांत शिंदे, कैलास दुधणकर, प्रफुल्ल भालेकर, विश्‍वास भोगम, श्रेयस कुरणे, सुनील पाटील, राजू पाटील, रितेश पाटील, नितीन देवीकर, संग्राम मांडवकर, आदी सदस्य उपस्थित होते.