अमली पदार्थविरोधी पथकाच्या सर्व अधिकार्यांची कोरोनाची चाचणी होणार
मुंबई – ‘बिग बॉस’मधील अभिनेता एजाज खान याला ३० मार्च या दिवशी अमली पदार्थ प्रकरणात अमली पदार्थविरोधी पथकाने विमानतळावरून कह्यात घेतले होते. ८ घंटे त्याची चौकशी करण्यात आली होती. त्याची कोरोनाची चाचणी केल्यावर ४ एप्रिलला ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याला एका रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे; मात्र त्याला अटक करणार्या, तसेच त्याची चौकशी करणार्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या सर्व अधिकार्यांचीच कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.