सोलापूर गारमेंट उद्योगाला कोरोना संसर्गामुळे मोठा फटका !

सोलापूर – कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षभरापासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्याने मागील वर्षी ५० टक्के गारमेंट कारखाने बंद पडले होते. चालू वर्षातही शाळा चालू होण्याची चिन्हे नसल्याने देशभरातून गणवेशाची येणारी मागणी बंद झाली आहे. त्यामुळे गारमेंट उद्योगातील २० सहस्र कामगारांवर बेकारीची वेळ येईल, अशी माहिती सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सहसचिव प्रकाश पवार यांनी एका वृत्तपत्राला दिली.

शाळा चालू होईल, या आशेने काही गारमेंट उद्योजकांनी सिद्ध करून ठेवलेले शालेय गणवेश पडून आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी भांडवल नाही, नवीन मागणी नाही, अशी येथील लघुउद्योजकांची स्थिती आहे. त्यामुळे सलग २ वर्षे व्यवसाय ठप्प असल्याने उद्योजकांवर आर्थिक संकट ओढवले आहे, असे प्रकाश पवार यांनी या वेळी सांगितले.