चेन्नई सुपरकिंग्जच्या टी शर्टवरील मद्य आस्थापनाचा लोगो हटवण्याची क्रिकेटपटू मोईन अली यांची मागणी मान्य

मुसलमान त्यांच्या धर्माचे कठोरपणे पालन करतात. अशांकडून हिंदू काही शिकतील का ?

हरिद्वार येथील सप्तसरोवर मार्गावर पेशवाईंचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वागत !

या पेशवाईमध्ये श्रीआदिनाथ आखाड्याचे महामंडलेश्‍वर योगीक्षील महाराज, पिठाधिश्‍वर श्रीत्रिलोकीनाथजी महाराज (श्रीनाथ बाबाजी), अन्य महामंडलेश्‍वर, महंत आणि भक्तगण सहभागी होते.

अफगाणिस्तानमध्ये वायूदलाच्या आक्रमणात ८० तालिबानी ठार

अफगाणिस्तानच्या अरघनदाब जिल्ह्यात वायूदलाने केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ८० आतंकवादी ठार झाले. यात तालिबानी संघटनेचा प्रमुख सरहदी हाही ठार झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान यांनी दिली.

मंत्र्यांवरील आरोपांविषयी मुख्यमंत्र्यांचे मौन अस्वस्थ करणारे ! – देवेंद्र फडणवीस

आतापर्यंत मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत इतके गंभीर आरोप झाले आहेत; मात्र मुख्यमंत्र्यांनी एकदाही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा महाराष्ट्राच्या प्रतिमेवरील डाग आहे. यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागेल…

वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची औषधे आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य यांचा तुटवडा !

संबंधितांनी ही समस्या लवकर सोडवावी, ही अपेक्षा ! कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दैनंदिन वापराची औषधे आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य यांचा तुटवडा रुग्णालयांमध्ये असणे अतिशय गंभीर आहे. जनतेच्या जिवाशी खेळणार्‍या संबंधित असंवेदनशील अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करा !

पश्‍चिम महाराष्ट्रातील मंदिरे ३० एप्रिलपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद !

श्री महालक्ष्मी मंदिर, जोतिबा देवस्थान यांसह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणारी सर्व मंदिरे तसेच पंढरपूर आणि तुळजापूर येथील मंदिरांचा समावेश !

बुलढाणा येथे सैलानी बाबांच्या यात्रेत गर्दी केल्याच्या प्रकरणी १ सहस्रांहून अधिक जणांवर गुन्हे नोंद !

कोरोनाच्या आपत्काळात दायित्वशून्यपणे वागणारे असे नागरिक भीषण आपत्काळात काय करतील, याची कल्पनाच न केलेली बरी !

भारतीय परंपरेत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र विधीला ‘पेटंट’ !

भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र या विधीवर आधारित प्रयोगाला ‘पेटंट’ मिळाले आहे. प्रत्येकाने येणार्‍या आपत्काळासाठी अत्यंत उपयुक्त असा अग्निहोत्र विधी शिकणे आवश्यक !

पुन्हा नक्षलवादी आक्रमण !

नक्षलवाद्यांना चीनसारख्या देशांतून शस्त्रसाठा मिळत आहे, तोही रोखण्याचा प्रयत्न गेल्या ६० वर्षांत होऊ शकलेला नाही, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे मोठे अपयश आहे.

१८ ते ३५ वयोगटातील तरुणांना तातडीने लसीकरण करण्याची व्यवस्था करावी !

‘जीव धोक्यात घालून फिरणार्‍या पत्रकारांनाही लस द्यावी’, अशी विनंती आव्हाड यांनी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करणार असल्याचे सांगितले.