|

नागपूर – येथे एकतर्फी प्रेमातून धर्मांध आरोपी शेख मोईन खान गुलाब सरवर खान याने तरुणीची आजी आणि १० वर्षांचा भाऊ यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर आरोपीने मनकापूर रेल्वे स्थानकात ट्रॅकवर उडी मारून आत्महत्या केली. लक्ष्मीबाई धुर्वे (वय ६५ वर्षे) आणि यश धुर्वे (वय १० वर्षे) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.
तरुणी महाविद्यालयात शिकत असून धर्मांध मोईन खान कोणताही कामधंदा करत नव्हता. ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक संकेतस्थळावरून एकमेकांची छायाचित्रे पाहून त्यांची ओळख झाली. काही वेळा त्यांची भेटही झाली; मात्र तिच्या कुटुंबियांनी तिला त्याच्यापासून दूर रहायला सांगितले. तेव्हापासून ती त्याला टाळू लागली. तरीही तो तिला भेटण्यासाठी यायचा, तिच्या कुटुंबियांसमवेत तिच्याशी वाद घालायचा. तिच्या भावालाही त्याने मारहाण केली होती, तसेच एकदा दबाव आणून तिलाही पुष्कळ मारहाण केली होती. ती घाबरल्याने आणि तिच्या डोळ्याला दुखापत झाल्याने तिची ती अवस्था पाहून अपकीर्तीच्या भीतीने कुटुंबियांनी त्याच्या विरोधात तक्रार दिली नाही आणि मुलीला नातेवाइकांकडे पाठवले. त्यामुळे आरोपीने चिडून हत्या केली.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !