सॅमसंग भारतात ४ सहस्र ८२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

उत्तरप्रदेशमध्ये डिस्प्ले युनिट स्थापन करणार

नवी देहली – ‘सॅमसंग’ या मोठ्या विदेशी आस्थापनाने चीनमधून त्याचे कारखाने बंद करण्याचा प्रयत्न चालवला असून आता भारतातील उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये कारखाना चालू करणार आहे. उत्तरप्रदेशच्या मंत्रीमंडळाने सॅमसंगच्या ‘ओएल्ईडी डिस्प्ले युनिट’ उभारण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. हा प्रकल्प चालू करतांना भारत सरकारने चालू केलेल्या ‘स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक कंपोनंट अँड सेमीकंडक्टर्स (एस्.पी.ई.सी.एस्.)’ अंतर्गत ४६० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सॅमसंग भारतात ४ सहस्र ८२५ कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.