काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे ३ आतंकवादी ठार, तर ४ सैनिक घायाळ

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्य !

गुजरात सरकारकडून ‘ड्रॅगन फ्रूट’ फळाचे ‘कमलम्’ असे नामांतर !

गुजरातमधील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता केंद्र सरकारनेही याविषयीचे निर्णय घ्यावेत !

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे एस्.टी. बसवर ‘संभाजीनगर’ असा फलक लावल्याच्या कारणावरून एम्.आय.एम्.कडून दगडफेक !

औरंगाबादवर एम्.आय.एम्.च्या धर्मांधांचे प्रेम आणि संभाजीनगर नामांतराला किती टोकाचा विरोध आहे, हे एस्.टी. बसवर केलेल्या दगडफेकीवरून दिसून येते.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २० जानेवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी कठोर कायदा करा !

हिंदु धर्माचा अवमान करणे, देवतांचे विडंबन, साधू-संतांच्या हत्या यांच्या विरोधात कठोर कायदा केंद्र आणि राज्य येथे पारित करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर यांनी केली आहे.

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर आणि कागल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निमखेडी (जिल्हा जळगाव) येथे अनधिकृतपणे बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून ग्रामस्थांची पोलिसांवर दगडफेक !

१९ जानेवारी या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यात वाद झाला. त्यानंतर काही ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली.

प्रत्येक वेळी हिंदु देवतांचा अवमानच का ? – ओंकार शुक्ल, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष, भाजप

‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने मिरज प्रांत कार्यालयात देण्यात आले.

आजपासून प्रकल्पग्रस्त जे.एन् पी.टी.तील बोटी रोखणार

आंदोलक मागण्यांसाठी होड्या आडव्या करून, जे.एन्.पी.टी. बंदरातील आंतराष्ट्रीय जलवाहतुकीशी संबंधित जहाजे रोखणार आहेत.

‘कल्याण’ मटक्याच्या चिठ्ठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र छापून त्यांचा अवमान !

हिंदूंच्या देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचा वेगवेगळ्या माध्यमातून अवमान करणार्‍यांवर त्वरित कठोर कारवाई करणारा कायदा केंद्र सरकारने देशात लागू करावा, अशी धर्मप्रेमींची मागणी आहे !