पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला २५ लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी चौघांना अटक

पुणे – २५ लाख रुपये मूल्याच्या २ सहस्र रुपयांच्या चलनी नोटा दिल्यास, दुप्पट मूल्याच्या अर्थात् ५० लाख रुपये मूल्याच्या ५०० च्या नोटा देण्याचे प्रलोभन दाखवून शिवणे येथील हॉटेल व्यावसायिकाला २५ लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला. कसबा पेठेतील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयासमोर २३ फेब्रुवारीला ही घटना घडली आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंद करून, आधुनिक वैद्यांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. २ आरोपी पसार आहेत.