अकोट (अकोला) येथे विश्व वारकरी सेनेचे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन !
अकोट (अकोला), १८ मार्च (वार्ता.) – चित्रपटगृहे, मद्याची दुकाने, राजकीय बैठका, विविध मोर्चे यांसाठी अनुमती दिली जाते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त धार्मिक कार्यक्रमांवरच बंदी घालण्यात आली आहे, हे राज्य शासनाचे धोरण अयोग्य आहे, तसेच अन्य राज्यांमध्ये धार्मिक कार्यक्रमांवर बंदी नाही. त्यामुळे नियम आणि अटी घालून वारकर्यांच्या धार्मिक कार्यक्रमांना अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन विश्व वारकरी सेनेच्या वतीने १७ मार्च या दिवशी तहसीलदार नीलेश मडके आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानोबा फड यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे, श्रीधर महाराज पातोंड, रतन महाराज वसु, श्रीधर महाराज तळेकर, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, वैभव महाराज वसु, सोपान महाराज ऊकर्डे, विक्रम महाराज शेटे यांसह असंख्य वारकरी उपस्थित होते.