हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत ! – शिवाजीराव मोहिते, संपादक, ‘सी’ न्यूज

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात आमचाही वाटा आहे, याचा आम्हाला आनंदच आहे, असे मत ‘सी’ न्यूजचे संपादक श्री. शिवाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले.

पुणे येथील कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेल्या तळई उद्यानाची दुर्दशा !

सिंहगडावर येणार्‍या पर्यटकांना विरंगुळा म्हणून वन विभागाने अनुमाने १ कोटी रुपये व्यय करून बांधलेले तळई उद्यान गेल्या ६ वर्षांपासून धूळ खात पडून आहे.

प्रत्येक हिंदूने स्वरक्षणाचे ध्येय ठेवले पाहिजे ! – हर्षद खानविलकर, हिंदु जनजागृती समिती

अभियंता किंवा आधुनिक वैद्य किंवा पदवीधर होऊन विदेशात पैसा कमावणे असे ध्येय ठेवण्यापेक्षा आता स्वरक्षणाचे ध्येय ठेवले पाहिजे, अशी अत्यावश्यकता निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवा !  – प्रकाश नाईक, माहिती अधिकारी, गोवा

राष्ट्रीय एकता बळकट करण्यासाठी आणि आपली कला अन् संस्कृती आणि मातृभाषेचे संवर्धन अन् समृद्धी साधण्यासाठी मुलांमध्ये बाल्यावस्थेपासूनच एकता आणि राष्ट्रप्रेम यांची ज्योत जागवणे आवश्यक असल्याचे श्री. प्रकाश नाईक यांनी सांगितले.

आसगाव येथे साईबाबा घुमटीची तोडफोड

सोनारखेड, आसगाव येथील साईबाबा घुमटीची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार स्थानिकांनी हणजूण पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

सीमावाढ भागाच्या विकास आराखड्यासाठी लवकरच निधी मिळणार ! – उदयनराजे भोसले

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा नगरपालिकेने सीमावाढ भागाचा ५१ कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला आहे. याविषयी मंत्रीमहोदयांसमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे.

बेलवंडी (जिल्हा नगर) येथील पोलीस ठाण्यातील ६ पोलीस कोरोनाबाधित

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही नगर येथील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील ६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे पोलीस सध्या घरीच विलगीकरणात आहेत

रायगडावरील ३२ मण सोन्याचे सिंहासन लवकर होण्यासाठी पू. भिडेगुरुजी यांचे शनीदेवाला साकडे !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उजाळा म्हणून रायगडावरील ३२ मण सोन्याचे सिंहासन लवकर व्हावे, असे साकडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाला साकडे घातले.

शरजील उस्मानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेहबूब शेख यांवर गुन्हा नोंद करण्याची पोलिसांची हिंमत नाही का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

शरजील आणि शेख या दोघांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २ मार्च या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना केली.

राज्यातील वीजतोडणी थांबवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील वाढीव वीज देयकांविषयी जोपर्यंत सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही, तोपर्यंत घरगुती आणि शेतकरी यांची वीजजोडणी तोडण्यात येणार नाही, अशी ग्वाही देऊन वीजतोडणी थांबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मार्च या दिवशी विधानसभेत दिले.