ठाणे, २२ एप्रिल (वार्ता.) – पट्टेरी वाघाच्या कातड्याची, तसेच पंजाची तस्करी करणार्या प्रशांत सिंह, चेतन गौडा, आर्यन कदम, अनिकेत कदम या ४ तरुणांना कोनगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून कातडे आणि ५ नखे असलेला पंजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.