कोरोना वाढण्याचा धोका ?
|
|
मुंबई – ‘मुसलमानबहुल भागांत काहींसाठी कोरोना एक विनोद आहे आणि काही जण त्याविषयी उदासीन आहेत. सरकारी आरोग्य कर्मचारीही या मुसलमानबहुल भागांत अधिक जात नाहीत. एकंदरीतच मास्क आणि लसीकरण या गोष्टी येथील लोक हसण्यावारी नेऊन उडवून लावत आहेत’, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘इस्लामनुसार रमजान मासात औषध घेत नसल्याने बहुसंख्य सर्वच अल्पसंख्यांक सध्या लस घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. येथील नागरिकांच्या मनात अपसमज आहेत, लोक घाबरत आहेत, तसेच शिक्षण आणि जागरूकतेचा अभाव आहे’, असे वार्ताहरांनी केलेल्या सर्वेक्षणात त्यांच्या लक्षात आले आहे.
कोरोना आणि मास्क घालणे, यांविषयी गांभीर्य नाही !
‘रमजानचा मास चालू असल्याने येथील मुसलमानबहुल भेंडीबाजार परिसरात रात्रीही दिवस असल्याप्रमाणे गर्दी आणि वर्दळ आहे. लोक एकमेकांशी, शेजार्यांशी गप्पा मारत बसलेले दिसतात; परंतु कुणीही तोंडाला मास्क लावत नाही’, असे काही वृत्तपत्रकारांना आढळले आहे. येथील लोक हसून मास्कच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळतात. डोंगरी भागातही काही दुकानदार मास्क केवळ गळ्यात अडकवात. कुठे पडताळणी होणार्या ठिकाणी गेले, तर केवळ तो लावतात. ‘मास्क न लावल्याने आतापर्यंत कुणीही टोकले नाही. ही केवळ दंड लावून लुटण्याची पद्धत आहे’, अशा प्रतिक्रिया येथील दुकानदारांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केल्या. ‘मास्कने काय होते ? तो कुणीच लावत नाही’, ‘भेंडीबाजार, डोंगरी आणि नालासोपारा या आमच्या भागांत कधीही मास्क वापरत नाही.’, ‘कोरोना हा आजार नाही. लोक तणावामुळे मरत आहेत. मी अल्लाहवाला आहे, मला काहीच होणार नाही’, अशा येथील लोकांच्या प्रतिक्रिया आहेत.
लसीविषयी कुठलेच गांभीर्य नाही !
रोजे संपेपर्यंत लस घेण्याचे येथील लोकांच्या नियोजनात नाही. ‘लस घेण्यास कुणी सांगितले नाही, तसेच रमजानमध्ये इंजेक्शनचा प्रश्नच येत नाही. लसीकरणानंतरही कोरोना होत आहे, मग काय लाभ’, अशा प्रतिक्रिया डोंगरी येथील नागरिक व्यक्त करत आहेत. ‘मला तर कुणी लसीसाठी विचारले नाही. कोणताही सरकारी कागद आला नाही. हा कोरोना काही नाही, केवळ भास आहे. अल्लाह जे करतो, ते चांगले करतो’, असेही एकाने सांगितले. ‘रमजानमध्ये कोणतेही औषध शरिरामध्ये घेऊ शकत नाही’, असेही काहींनी सांगितले. असे बरेच लोक आहेत, ज्यांना हेसुद्धा माहिती नाही की, सरकारकडून लसीकरण विनामूल्य केले जात आहे.
त्यामुळे या भागात लसीविषयी जनजागृती करण्याची अधिक आवश्यकता आहे, असे खासगी संस्थांचे म्हणणे आहे. एका सामाजिक संस्थेने पठाणवाडी या भागात २४० जणांचे लसीकरण केले. इस्लामी धर्मगुरूंनी लस आणि मास्क यांविषयी सांगावे, असे त्यांना वाटत आहे.
मुंबईत सर्वत्र विनामास्क असलेल्यांना आकारण्यात येणारा दंड डोंगरी किंवा भेंडीबाजार येथील नागरिकांना नाही !भेंडीबाजारच्या मुख्य रस्त्यावर रात्री पोलीस असतात, तेथे गर्दी नसते; मात्र आतील भागांतील रस्ते आणि मशिदी यांभोवती यात्रेप्रमाणे वातावरण अन् दिवसाप्रमाणे गर्दी असते. खाद्यपदार्थ आणि पेये यांची दुकाने उघडी असतात अन् लोक चौकांत मास्कविनाच गटागटाने उभे असतात. मुले रस्त्यावर खेळत असतात. शेकडो लोकांच्या गर्दीत अत्यंत अत्यल्प लोक मास्क वापरतात. डोंगरीमध्येही रात्रीच्या जागरणासारखे वातावरण असून गल्ल्यांमध्ये गटागटाने लोक असतात. मुंबईतील बर्याच भागांत तोंडाला मास्क नसलेल्यांना मोठा दंड आकारण्यात येत आहे. सरकारी कर्मचारी सांगतात, ‘येथे कुणीही येत नाही.’ येथे पोलीस कुणालाही थांबवत नाहीत, मास्कविषयी विचारत नाहीत कि कुणाला टोकत नाहीत. काही पोलीसच विनामास्क होते. |