चर्चमधील पाद्रयांनी विवाह करण्यास कोणतीही अडचण नाही ! – पोप फ्रान्सिस

एका मुलाखतीत ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप यांना जर्मनीतील कॅथॉलिक चर्चकडून समलैंगिक विवाहांना देण्यात आलेली अनुमती आणि चर्चमध्ये मुलांचे होणारे लैंगिक शोषण यांविषयी प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी असे उत्तर दिले !

ब्रिटन सरकारच्या धोरणांवर टीका करणार्‍या वृत्त निवेदकाची बीबीसीकडून उचलबांगडी !

गुजरात दंगलींविषयी खोटी माहिती प्रसारित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कलंकित केल्यावर वृत्तपत्र स्वातंत्र्यांची आवई उठवणार्‍या बीबीसीचे खरे स्वरूप जाणा !

जर्मनीत चर्चमधील गोळीबारात ७ जण ठार

या आक्रमणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी चर्चच्या परिसरात नाकाबंदी केली आहे.

पाकमधील महिलांच्या अधिकाराच्या उल्लंघनाच्या विरोधात नेदरलँड्समध्ये मोर्चा

यात ‘अ‍ॅक्शन कमेटी फॉर क्रिश्‍चियन राइट्स’, ‘ओव्हरसीज पाकिस्तान क्रिश्‍चियन अलायन्स’ आणि ‘ग्लोबल ह्यूमन राइट्स डिफेंस’ या संघटनांनी सहभाग घेतला.  

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयुक्तांची काश्मीरविषयीची भूमिका अयोग्य ! – भारत

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयुक्त कार्यालयाने काश्मीर प्रश्‍नावर मांडलेली भूमिका अयोग्य असल्याचे भारताने म्हटले आहे. ‘हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे’, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी सांगितले.

पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी होळीच्या शुभेच्छा देतांना पणतीचे चित्र केले ट्वीट !

‘दिवाळीच्या वेळी पणती लावली जाते, होळीच्या वेळी नाही’, या कारणावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

(म्हणे) ‘भारताच्या संसदेत विरोधी पक्षनेत्यांचे ध्वनीक्षेपक बंद केले जातात !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

जगभरात भारताची प्रतिमा मलीन करणार्‍या अशा लोकांमध्ये ‘राष्ट्रभक्ती किती आहे ?’ हे स्पष्ट होते ! अशी मानसिकता असलेल्या लोकांचा भरणा असलेल्या काँग्रेस पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य करणे, हे भारतियांसाठी दुर्दैवी आहे !

रशियात कोरोनावरील लस शोधणार्‍यांपैकी एका शास्त्रज्ञाचा खून

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोविड लसीवरील कार्यासाठी वर्ष २०२१ मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड’ पुरस्काराने सन्मानित केले होते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.  

(म्हणे) ‘मी ब्रिटनमध्ये बोलू शकतो; पण भारतीय संसदेत चीनच्या घुसखोरीचे सूत्र उपस्थित करण्याची अनुमती नाही !’-राहुल गांधी

भारतातील अर्ध्याहून अधिक राज्यांत भाजप अथवा भाजपसमर्थित सरकार असतांना आणि काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ही यांपैकी ६ राज्यांतून निर्विघ्नपणे गेलेली असतांना राहुल गांधी यांच्या या विधानावर एखादे शेंबडे पोर तरी विश्‍वास ठेवील का ?