संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयुक्तांची काश्मीरविषयीची भूमिका अयोग्य ! – भारत

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्रमणी पांडे

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयुक्त कार्यालयाने काश्मीर प्रश्‍नावर मांडलेली भूमिका अयोग्य असल्याचे भारताने म्हटले आहे. ‘हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे’, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी सांगितले. ‘मागील काही मासांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या समवेत काश्मीरमधील मानवाधिकारांच्या चिंताजनक स्थितीवर चर्चा करण्याची संधी मिळाली’, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयुक्त वोल्कर तुर्क यांनी म्हटले होते.