पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी होळीच्या शुभेच्छा देतांना पणतीचे चित्र केले ट्वीट !

पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ

लंडन (ब्रिटन) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ट्वीट करून होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ‘हॅपी होली’ असे लिहिले होते. त्याच समवेत त्यांनी पणतीचे चित्र पोस्ट केले. ‘दिवाळीच्या वेळी पणती लावली जाते, होळीच्या वेळी नाही’, या कारणावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

सिंधच्या मुख्यमंत्र्यांचीही झाली चूक

यापूर्वी वर्ष २०२१ मध्ये पाकच्या सिंध प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांनी दिवाळीच्या निमित्ताने होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यानी ते ट्वीट काढून टाकले होते.