रशियात कोरोनावरील लस शोधणार्‍यांपैकी एका शास्त्रज्ञाचा खून

एंड्री बोटीकोव

मुंबई – कोरोनावर अन्यत्र कुठे लस आली नसतांना रशियाने ‘स्पुटनिक व्ही’ ही लस प्रथम बाजारात आणली होती. ही लस विकसित करणार्‍या १८ शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या एंड्री बोटीकोव यांचा पट्ट्याने गळा दाबून खून करण्यात आला आहे. ४७ वर्षीय बोटीकोव हे वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोविड लसीवरील कार्यासाठी वर्ष २०२१ मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड’ पुरस्काराने सन्मानित केले होते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.