Maldive Politics : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची मागणी

भारतासमवेतच्या वादानंतर मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची मागणी होऊ लागली आहे.

‘El Niño’ Effect : काश्मीरमध्ये यावर्षी तापमान उणे असूनही बर्फवृष्टीच नाही !

एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.

Goa Power Hikes : गोव्यात वीज दरवाढीविषयी जनसुनावणी – ग्राहकांचा तीव्र विरोध

नवीन वीजदर वीजनियमन आयोगाकडून संमत झाल्यास १ एप्रिल २०२४ पासून नवीन वीजदर लागू करण्यात येतील.

PurpleFest2024 : ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२४’चे उद्घाटन

‘‘विकलांग (दिव्यांग) व्यक्ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी विशेष आहेत. ते विकलांग नसून देशासाठी विशेष आहेत.’’

तलाठी भरती परीक्षेत अपव्यवहार झाल्याचे पुरावे मिळाल्यास परीक्षा रहित करण्यात येईल ! – फडणवीस, उपमुख्यमंत्री

तलाठी भरती परीक्षेत मोठा अपव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

१० जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल !

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल १० जानेवारी या दिवशी दुपारी ४ नंतर लागणार आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणूक रहित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर खासदारपदाची जागा रिकामी होती. ६ मासांमध्ये निवडणूक घेणे आवश्यक होते; परंतु ती घेतली नव्हती.

बलात्कार प्रकरणी पुणे येथील उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद !

तक्रारदार युवतीची उपनिरीक्षक शिंदे यांची ओळख होती. शिंदे यांनी या युवतीचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी तिच्याकडून महागड्या भेटवस्तूही घेतल्या, तसेच अनेकवेळा तिच्यावर बळजोरी केली. संबंधित युवतीने लग्नाची विचारणा केल्यानंतर शिंदे याने तिच्याशी असलेले संबंध तोडले.

न्यासाचा लौकिक देशात असून तो धार्मिक आणि सांस्कृतिकता यांचे प्रतीक ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप, तेलंगाणा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली चालू केलेल्या महाप्रसादाच्या सेवेसमवेत विविध उपक्रम चालू आहेत.

महाराष्ट्र गुप्तवार्ता पोलीस खात्यातील ९१ पदांवर होणार कंत्राटी भरती !

महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभागाचा आकृतीबंध गृहविभागाने अंतिम केला असून याद्वारे गुप्तवार्ता विभाग आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालयांमध्ये ९१ पदांवर कंत्राटीपद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.