मुंबई – शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल १० जानेवारी या दिवशी दुपारी ४ नंतर लागणार आहे. हा निकाल मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासमवेत बाहेर पडलेले आमदार यांच्या विरोधात लागल्यास, म्हणजे त्यांना पक्षातून बाहेर पडूनही सत्तेत असणे अपात्र दाखवण्यात आल्यास मुख्यमंत्रिपद, तसेच अन्य आमदारांची आमदारकी पर्यायाने सरकार अडचणीत येऊ शकते. त्यातून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. उद्धव ठाकरे गटाने शिंदे यांच्यासमवेत गेलेल्या आणि आता सत्तेत असलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ७ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.