श्रीक्षेत्र कांदळी येथे भक्‍तीमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्‍सव साजरा !

श्रीक्षेत्र कांदळी येथे प्रतिवर्षीप्रमाणे ‘श्री रामचंद्र देव एवं प.पू. भक्‍तराज महाराज समाधी ट्रस्‍ट’च्‍या वतीने २ जुलै आणि ३ जुलै २०२३ या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या २ दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.

राज्‍यातील ९ जिल्‍ह्यांत अनधिकृत विनापरवाना कापूस बियाण्‍याची विक्री !

शेजारील राज्‍यातून आणून महाराष्‍ट्रात बियाण्‍यांची विक्री केली जाते. अनेक ठिकाणी घरांमध्‍ये साठा करून गुपचुप विक्री करण्‍यात येते. कृषी विभागाच्‍या गुणवत्ता नियंत्रण पथकांच्‍या वतीने अशा चोरट्या विक्रेत्‍यांवर कारवाई करण्‍यात येत आहे.

सनातन संस्‍थेच्‍या वतीने वणी आणि यवतमाळ येथे ३ गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात पार पडले !

‘जीवनात गुरूंचे महत्त्व आणि परिवारात सुसंस्‍कार निर्माण करण्‍याची आवश्‍यकता’ या विषयावर , तसेच भारत देशाला समान नागरी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा, गोरक्षण कायदा तसेच लव्‍ह जिहादविरोधी कायदा करून त्‍यांची कठोर कार्यवाही करणे आवश्‍यक या विषयावर बहुमूल्‍य मार्गदर्शन केले.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने जळगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सव उत्‍साहात साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने यश लॉन, पिंप्राळा रोड, जळगाव आणि श्रीराम मंदिर, पाळधी, तालुका धरणगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सव उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.

नम्र, परिपूर्ण सेवेचा ध्‍यास असलेले आणि सर्वांवर पितृवत् प्रेम करणारे श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) १२५ व्‍या संतपदी विराजमान !

आनंद वार्ता ! साधकांवर पितृवत् प्रेम करणारे पू. अरविंद सहस्रबुद्धे यांना संत घोषित केल्‍यावर महाराष्‍ट्रातीलच नव्‍हे, तर त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍या भारतातील अनेक साधकांनाही आनंदाची पर्वणीच प्राप्‍त झाली.

छत्रपती संभाजीनगर येथे स्‍वतःचे मृत्‍यू प्रमाणपत्र घेऊन महिला पोचली पंचायत समितीत !

केवळ पैशांसाठी हा सर्व खटाटोप करणारे महिला जिवंत असतांनाही खोट्या कागदपत्रांद्वारे मृत्‍यूचे प्रमाणपत्र देणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी.

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट !

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ६ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची दैनिक ‘सामना’च्‍या कार्यालयात भेट घेतली. तत्‍पूर्वी त्‍यांनी गाडीने एकत्र प्रवास केला.

अजित पवार मुख्‍यमंत्री होणार असल्‍याच्‍या अफवा यशस्‍वी होणार नाहीत ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

जितदादा सरकारमध्‍ये सहभागी झाल्‍यानंतर ते मुख्‍यमंत्री होणार आहेत, असे कोण पिकवत आहे, त्‍यांचे मनसुबे यशस्‍वी होणार नाहीत, असे मत राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

शरद पवार गटाच्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांचे निलंबन !

शरद पवार गटाच्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या कार्यकारिणीची बैठक ६ जुलै या दिवशी देहली येथे झाली. या बैठकीमध्‍ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्‍यात आले आहे.

अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्‍यास शिवसेनेच्‍या आमदारांचा विरोध !

शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांसह भाजपच्‍या ६ आमदारांनी अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्‍यास विरोध दर्शवला आहे.