नम्र, परिपूर्ण सेवेचा ध्‍यास असलेले आणि सर्वांवर पितृवत् प्रेम करणारे श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) १२५ व्‍या संतपदी विराजमान !

आनंद वार्ता !

पू. अरविंद सहस्रबुद्धे

पुणे, ६ जुलै (वार्ता.) – नम्र, परिपूर्ण सेवेचा ध्‍यास असलेले आणि सर्वांवर पितृवत् प्रेम करणारे सनातनचे साधक श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) सनातनच्‍या १२५ व्‍या संतपदी विराजमान झाले. पुणे येथे झालेल्‍या एका अनौपचारिक कार्यक्रमात त्‍यांच्‍या व्‍यष्‍टी संतपदाची आनंददायी घोषणा सनातनच्‍या धर्मप्रचारक संत सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी केली. त्‍यानंतर सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी पू. अरविंद सहस्रबुद्धे यांना शाल,  श्रीफळ आणि भेट वस्‍तू देऊन त्‍यांचा सन्‍मान केला. या सोहळ्‍याला पू. अरविंद सहस्रबुद्धे यांच्‍या ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणार्‍या पत्नी सौ. मंगला सहस्रबुद्धे, मुलगी सौ. अंजली बोडस, पू. (सौ.) मनीषा पाठक आणि पुणे येथील काही साधक उपस्‍थित होते.

पू. अरविंद सहस्रबुद्धे यांच्‍या जीवनात साधनेमुळे झालेले आमुलाग्र पालट, त्‍यांनी अनेक कठीण प्रसंगांना स्‍थिरतेने सामोरे जाणे, त्‍यांची सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर असलेली श्रद्धा यांचे प्रसंग ऐकून उपस्‍थितांची भावजागृती झाली. साधकांवर पितृवत् प्रेम करणारे पू. अरविंद सहस्रबुद्धे यांना संत घोषित केल्‍यावर महाराष्‍ट्रातीलच नव्‍हे, तर त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍या भारतातील अनेक साधकांनाही आनंदाची पर्वणीच प्राप्‍त झाली.
(या सोहळ्‍याचे सविस्‍तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)