यवतमाळ, ६ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यात ३ जुलैला सनातन संस्थेच्या वतीने आयोजित साई सत्यज्योत मंगल कार्यालय, यवतमाळ; भातृमंडळ सभागृह, विठ्ठलवाडी आणि एस्.बी. हॉल, वणी येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडले.
यवतमाळ येथील कार्यक्रमात अखिल भारतीय माहेश्वरी समाजाचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी श्री. महेशचंद्रजी करवा यांनी ‘जीवनात गुरूंचे महत्त्व आणि परिवारात सुसंस्कार निर्माण करण्याची आवश्यकता’ या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले.
विठ्ठलवाडी येथे अधिवक्ता आशिष वानखडे यांनी भारत देशाला समान नागरी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा, गोरक्षण कायदा तसेच लव्ह जिहादविरोधी कायदा करून त्यांची कठोर कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले.
वणी येथे हिंदुत्वनिष्ठ उद्योजक श्री. राज जयस्वाल मार्गदर्शन करतांना म्हणाले की, धर्माचरणी समाजाच्या पाठीशी ईश्वर असतो, एवढे धर्माचरणाचे महत्त्व आहे. देवळातून धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचा लघुपट दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार तथा हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मणलाल खत्री, वणी भाजप शहर उपाध्यक्ष श्री. अनुराग काठेड, गुरुदेव सेवा मंडळाचे श्री. झाडे आणि मालेकर, श्रीराम महाआरती भक्त मंडळाचे श्री. नरेश निकम आणि कल्याण पांडे, संतोष किलावत आदी मान्यवरांसह ५०० हून अधिक जिज्ञासू, धर्मप्रेमीउपस्थित होते.
या वेळी कु. जिज्ञासा धारणे आणि कु. शिवानंद देशपांडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सौ. माया पिसोळकर यांचे हस्ते करण्यात आला.
गुरूंचे महत्त्व, लव्ह जिहाद , धर्माचरणाचे महत्त्व या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
‘सनातन शॉप’वरील मराठी ग्रंथाची लिंक https://sanatanshop.com/shop/ebooks/marathi/ |