नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षातून हकालपट्टी

काठमांडू (नेपाळ) – नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षाच्या सर्वसाधारण सदस्यपदावरून हकालपट्टी केली. यापूर्वी या गटाने ओली यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवले होते. ओली यांच्या काही कृतींविषयी पक्षाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते; मात्र त्यांनी स्पष्टीकरण न दिल्यामुळे प्रचंड आणि माधवकुमार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या स्थायी समितीच्या बैठकीत ओली यांना सदस्य म्हणून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील गटाने पंतप्रधानांच्या बालुवाटार येथील निवासस्थानी हकालपट्टीचे पत्र नेऊन दिले.