सुश्रुतांच्या काळापासून आयुर्वेदात शस्त्रक्रियांचा उल्लेख आढळतो ! – केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक
‘माझीच उपचारपद्धत श्रेष्ठ’, असे कुणीही म्हणू नये. केंद्रशासनही कुणाची मक्तेदारी (मॉनोपॉली) मोडून काढू इच्छित नाही. एखाद्या औषधाने जर रुग्ण कायमचा बरा होत असेल, तर त्यामध्ये काय वावगे आहे ? आयुर्वेदात पदवी घेणारे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले यांना शस्त्रक्रिया शिकवली जाते. सुश्रुतांच्या काळापासून आयुर्वेदात शस्त्रक्रियांचा उल्लेख आढळतो.