सांगली शहर भाजपच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतीदिन हा ‘समर्पणदिन’ म्हणून साजरा !

११ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत समर्पण पंधरवडा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनाच्या निमिताने भाजप पदाधिकारी यांनी समर्पण निधी सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला.

राष्ट्रसेवा दल १० लाख शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या राष्ट्रपतींना पाठवणार !

देशातील शेतकर्‍यांच्या बाजूने उभे रहाण्याऐवजी केंद्र सरकार या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. या आंदोलनाला राष्ट्र्रसेवा दलाचा पाठिंबा आहे.

भारतासह जगात १२ घंट्यांत ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के

भारतातील मिझोराममध्येही भूकंपाचा झटका जाणवला. चंपाई येथे ३.१ रिक्टर स्केल भूकंपाचा झटका जाणवला.

कळमपुरी (जिल्हा हिंगोली) येथील पालिकेच्या उद्यानाला आग लागल्याने खेळण्याच्या साहित्याची हानी

पालिकेच्या उद्यानामधील वाळलेल्या गवताला आग लागून १० फेब्रुवारी या दिवशी खेळण्याच्या साहित्याची अनुमाने ३ लाख रुपयांची हानी झाली आहे.

गावठी बंदूक आणि ३ जिवंत काडतुसे बाळगणार्‍यासह २ जण पोलिसांच्या कह्यात

सांगली जिल्ह्यातील वांगी गावातील एका सराईत गुन्हेगाराने ही बंदूक ठेवण्यास दिल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून सराईत गुन्हेगाराला कह्यात घेतले.

पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून गुन्हेगाराची हत्या !

भरदिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येसारखी घटना घडणे हे पोलीस खात्याला लज्जास्पद !

सांगली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये आग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यास अपयशी !

शासकीय रुग्णालये आग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यास अपयशी का ठरली ? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. यामध्ये दोषी असणार्‍यांवर कठोर कारवाई झाल्यासच अशा चुका पुन्हा होणार नाहीत.

राजस्थानच्या रा.स्व. संघाच्या जिल्हाचालकांवर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

काँग्रेसच्या राज्यात रा.स्व. संघाच्या संघचालकांवर प्राणघातक आक्रमण होते; मात्र काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी, बसप, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष किंवा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत !

कासगंज (उत्तरप्रदेश) येथे दारू माफियांनी केलेल्या आक्रमणात १ पोलीस ठार तर दुसरा गंभीररित्या घायाळ !

दारू माफियांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्यात पोलिसांचा धाक नाही, हेच यातून लक्षात येते ! उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने अशा घटना घडत आहेत !

देशातील रस्ते अपघात कोरोनापेक्षा अधिक गंभीर ! – केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी

देशात दिवसाला ४१५ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ही परिस्थिती कोरोना महामारीपेक्षाही अधिक गंभीर आणि पुढील काळात आणखी चिंताजनक होऊ शकते. परिवहनमंत्री म्हणून या गोष्टीविषयी मी अतिशय संवेदनशील आणि गंभीर आहे.