
सांगली, ११ फेब्रुवारी – सांगली शहर भाजपच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतीदिन आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात ‘समर्पणदिन’ म्हणून साजरा करण्यात आला. ११ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत समर्पण पंधरवडा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनाच्या निमिताने भाजप पदाधिकारी यांनी समर्पण निधी सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला.
या प्रसंगी भाजप आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, संघटन सरचिटणीस दीपक माने, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकरतात्या पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, सरचिटणीस केदार खाडिलकर, प्रकाशतात्या बिरजे, श्रीकांत शिंदे, डॉ. भालचंद्र साठे, नगरसेविका सोनालीताई सागरे, भारतीताई दिगडे, उर्मिलाताई बेलवलकर, श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली