कासगंज (उत्तरप्रदेश) येथे दारू माफियांनी केलेल्या आक्रमणात १ पोलीस ठार तर दुसरा गंभीररित्या घायाळ !

पोलिसांकडून एक दारू माफिया चकमकीत ठार

दारू माफियांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्यात पोलिसांचा धाक नाही, हेच यातून लक्षात येते ! उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने अशा घटना घडत आहेत !

माफियांनी देवेंद्र या पोलीस शिपायाला मरेपर्यंत मारहाण केली

कासगंज (उत्तरप्रदेश) – येथील गावात दारू माफियांच्या अड्डयावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर या माफियांनी आक्रमण केल्याने यात एका पोलीस शिपाई ठार झाला, तर पोलीस उपनिरीक्षक अशोक कुमार गंभीररित्या घायाळ झाले.

यानंतर पुढील २४ घंट्यांत पोलिसांनी यातील मुख्य आरोपीला चकमकीत ठार केले, तर दुसर्‍याचा शोध घेतला जात आहे. या माफियांनी देवेंद्र या पोलीस शिपायाला मरेपर्यंत मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.