सोलापूर शहरात सातही दिवस दुकाने चालू रहाणार

शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने २ एप्रिलपासून सातही दिवस सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

रायगड किल्ल्यावरील उत्खननात सापडली ३५० वर्षांपूर्वीची अडीच तोळे वजनाची नक्षीदार सोन्याची बांगडी !

किल्ल्यावरील जगदीश्‍वर मंदिराच्या शेजारी असलेल्या एका वाड्याच्या उत्खननामध्ये ही बांगडी सापडली. ही बांगडी ३५० वर्षांपूर्वीचा अनमोल ठेवा असल्याचे तज्ञांचे मत आहे.

नागपूर येथे एकाच दिवशी ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

२ एप्रिल या दिवशी शहरातील ६० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचाराच्या वेळी मृत्यू झालेला आहे; मात्र नागरिक अजूनही बेफिकीर आहेत. गेल्या २४ घंट्यांत शहर आणि जिल्ह्यात ४ सहस्र १०८ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे.

राज्य सरकार कोविड अल्प करण्यात नाही, तर लोकांना त्रास देण्यात गुंतलेले ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या भाषणात कोव्हिड का वाढत आहे ? तो आपल्या महाराष्ट्रातच का वाढत आहे ? त्यावर आम्ही काय उपाययोजना करतो आहोत, हे सांगण्याची आवश्यकता होती….

कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ७०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त ! – तीरथसिंह रावत, मुख्यमंत्री, उत्तराखंड

कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ७०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेमध्ये दिली.

रांगिया (आसाम) येथे अज्ञातांनी फडकावलेला पाकचा राष्ट्रध्वज स्थानिकांनी जाळला !

विरोधकांनी याला भाजपच उत्तरदायी असल्याचा आरोप केला. भाजप राज्यात धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला; मात्र हा झेंडा नेमका कुणी लावला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘कोवॅक्सिन’च्या तिसर्‍या डोसच्या चाचणीला अनुमती

औषध नियंत्रणाविषयीच्या तज्ञांच्या समितीने ‘कोवॅक्सिन’ लसीचा तिसरा डोस देण्याच्या चाचणीला अनुमती दिली आहे. या डोसमुळे शरिरातील कोरोनाविरोधी रोगप्रतिकारक शक्ती अनेक वर्षांसाठी वाढणार आहे.  

भ्रमणभाष संचावर खेळ खेळण्यावरून आईवडील ओरडल्याने १५ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात जीवनाचे महत्त्व आणि ध्येय सांगून व्यक्तीला शाश्‍वत आनंद मिळण्यासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षण देण्यात येईल. त्यामुळे कुणीही आत्महत्या करणार नाही !

भारताच्या ७ शेजारी देशांतील हिंदूंची स्थिती चिंताजनक !

भारतातील हिंदूंचीच स्थिती जेथे चांगली नाही, तेथे अन्य देशांतील हिंदूंची आणि तेही इस्लामी देशांतील हिंदूची स्थिती कधीतरी चांगली असू शकते का ? ही स्थिती पालटण्यासाठी सर्वप्रथम भारतातील हिंदूंची स्थिती चांगली करण्यासाठी येथे हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे.

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे चालूच ! राज्यात साधू, संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे आणि आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कर्मभूमीतच अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !