नागपूर – २ एप्रिल या दिवशी शहरातील ६० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचाराच्या वेळी मृत्यू झालेला आहे; मात्र नागरिक अजूनही बेफिकीर आहेत. गेल्या २४ घंट्यांत शहर आणि जिल्ह्यात ४ सहस्र १०८ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ४० सहस्र ८०७ इतकी झाली आहे. शहरात उपचाराच्या वेळी मृत्यू पावणार्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या राज्यातील इतर महानगरांपेक्षा पुष्कळ अधिक आहे.
कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयांत एकही खाट उपलब्ध नाही. २ एप्रिल या दिवशी बाधित झालेल्या नागरिकांमध्ये १ सहस्र २४८ रुग्ण ग्रामीण नागपूरचे, तर २ सहस्र ८५७ रुग्ण हे नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाही.