विजापूर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात ४ सैनिक हुतात्मा : ३ नक्षलवादी ठार

गेल्या ६ दशकांत नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड करू न शकलेला भारत !

साटेली, भेडशी येथे तिलारी नदीच्या पात्रातील गाळ न काढल्यास नदीच्या पात्रातच उपोषण करण्याची चेतावणी

तालुक्यातील तिलारी धरण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठा पाऊस पडल्यावर साटेली, भेडशी येथील नदीला मोठा पूर येतो, तेव्हा कालव्यांचे दरवाजे उघडले जातात आणि पाण्याचा लोंढा येऊन पूरस्थिती निर्माण होते.

भ्रमणभाषवर ओटीपी क्रमांक विचारून युवकाची दीड लाख रुपयांची फसवणूक

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या युवकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या वेळी पोलिसांनी सायबर कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी विशेष शासकीय अधिवक्ता म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा !

देवेंद्र फडणवीस यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक श्रीनिवास रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी प्रज्ञा सरवदे अन्वेषण करणार !

मेळघाटातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च या दिवशी केलेल्या आत्महत्या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी प्रज्ञा सरवदे करणार आहेत. वन विभाग प्रधान मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी ३ एप्रिल या दिवशी आदेश काढले.

पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात दळणवळण बंदीच्या काळात परस्पर संमतीने १ सहस्र ४ घटस्फोट !

एका महानगरातील घटस्फोट घेणार्‍यांच्या संख्येवरून संपूर्ण भारतात या सामाजिक प्रश्‍नाने किती भीषण रूप धारण केले आहे, याचा अंदाज येऊ शकतो. ‘केवळ धर्मशिक्षणामुळेच कुटुंबसंस्था पर्यायाने समाजव्यवस्था बळकट होऊ शकेल’, असे म्हटल्यास चूक ते काय ?

रंगपंचमीच्या दिवशी तिघांचा मृत्यू !

यशराज माळी (वय १६ वर्षे) याने रंगपंचमीनंतर स्नानासाठी खाणीत उडी मारल्यावर तो गाळात रूतला. त्याचा गुदमरून मृत्यू झाला. कोडोली येथे शिवराज साळोखे (वय १४ वर्षे) आणि शुभम पाथरवट (वय १४ वर्षे) हे दोघे तोल जाऊन विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

निलंबित नगररचना सहसंचालकाकडे ८२ कोटी रुपये सापडले !

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याकडे अनुमाने ८२ कोटी रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ

मुकेश अंबानी यांच्या निवास स्थानाच्या बाहेर स्फोटकांसाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची पोलीस कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.