सोलापूर शहरात सातही दिवस दुकाने चालू रहाणार

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती

सोलापूर – शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने २ एप्रिलपासून सातही दिवस सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

आयुक्तांनी या वेळी सांगितले की, यापूर्वीच्या आदेशानुसार शहरातील दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत चालू ठेवण्याची अनुमती होती. शनिवार आणि रविवार या दिवशी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश होते. या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सुधारित आदेशानुसार २ एप्रिलपासून महापालिकेने शहरात नवीन नियमावली लागू केली आहे.