‘इ-मेल’द्वारे २० कोटी रुपयांची खंडणी मागितली !
मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांना २७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना ‘इ-मेल’ पाठवून २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. ‘हे पैसे न दिल्यास देशातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांकडून तुम्हाला मारून टाकू’, असे धमकी देणार्याने सांगितले आहे. हा ‘इ-मेल’ मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांचे सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे गामदेवी पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार प्रविष्ट करून अन्वेषण चालू केले आहे.
#MukeshAmbani receives death threat, email demands Rs 20 crorehttps://t.co/mFrYf32lsk pic.twitter.com/aMEFGR7BzQ
— Gulistan News (@GulistanNewsTV) October 28, 2023
केंद्रीय गृह मंत्रालयाने २९ सप्टेंबर या दिवशी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. ‘रिलायन्स फाऊंडेशन’ रुग्णालयाच्या क्रमांकावर धमकीचे दूरभाष आले होते. दूरभाष करणार्याने ‘३ घंट्यांत त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले जाईल’, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती.