आंबोली-आजरा सीमेवर हत्तीच्या आक्रमणात वन कर्मचार्‍याचा मृत्यू 

सावंतवाडी – आंबोली (सिंधुदुर्ग) आणि आजरा (कोल्हापूर) या गावांच्या सीमेवर घाटकरवाडी येथे हत्तीने केलेल्या आक्रमणात कोल्हापूर वन विभागाचे कर्मचारी प्रकाश पाटील (वय ५४ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला.

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हत्तींची समस्या आहे. हे हत्ती येथे भातशेती, बागायती यांची हानी करत आहेत. जिल्ह्यात हत्ती आले की, वन विभागाचे कर्मचारी त्याला कोल्हापूरच्या सीमेत पिटाळतात, आणि कोल्हापूर येथे हत्ती गेले की, तेथील वन कर्मचारी ते सिंधुदुर्गच्या सीमेत पिटाळतात. घाटकरवाडी येथे धरण असून आजूबाजूला उसाची शेती आहे. २८ ऑक्टोबर या दिवशी आंबोली-आजरा या गावांच्या सीमेवर हत्तीने पाटील यांना सोंडेत पकडून भूमीवर आपटले आणि पायाने चिरडले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.